आदरणीय ,
बंधुनो प्रत्येक माणूस हा परीपूर्ण नसतोच तरी पण तो अपुर्णत्वाकडून पुर्णत्वाकडून जाण्याची धडपड करत असतो . तसेच या ब्लॉग मध्ये काही बाबी अपूर्ण असतील तर मोठ्या मनाने व उदार अंतकरणाने समजून घ्याल व आपणास आढळणाऱ्या उणीवा व आपल्या मौल्यवान सूचना मला कळवून सहकार्याची साथ द्याल हिच अपेक्षा .
शिक्षक बंधु आणि भगिनीनो,
सप्रेम नमस्कार,
हा ब्लॉग प्रसिद्ध करताना मला विशेष आनंद
होत आहे . शिक्षक म्हणून ज्ञानदान काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा
दृष्टीने एक ब्लॉग निर्मिती करणे हा एक छोटासा प्रयत्न आहे . शालोद्यानातून
उमलणाऱ्या सुंदर कोमल फुलावर सुसंस्कार व्हावे, या बाल मनाचा सर्वांगीण
म्हणजे भावनिक, बौद्धिक, शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास व्हावा. हा विकास
घडवण्याचे कार्य ज्ञानमंदिरच यशस्वीरित्या करू शकतात . ज्ञानार्जनाच्या या
कार्यात मार्ग दाखवणारे शिक्षक हेच खरे मार्गदर्शक असतात. बंधुहो आपली हि
मार्गदर्शकाची भूमिका यशस्वीरित्या पार पडण्यासाठी माझा हा
ब्लॉग आपणास वेळोवेळी उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे . बंधुनो प्रत्येक माणूस हा परीपूर्ण नसतोच तरी पण तो अपुर्णत्वाकडून पुर्णत्वाकडून जाण्याची धडपड करत असतो . तसेच या ब्लॉग मध्ये काही बाबी अपूर्ण असतील तर मोठ्या मनाने व उदार अंतकरणाने समजून घ्याल व आपणास आढळणाऱ्या उणीवा व आपल्या मौल्यवान सूचना मला कळवून सहकार्याची साथ द्याल हिच अपेक्षा .
दीपज्योतीची तेजस्वी किरणे म्हणजे यश आनंद सौख्य मांगल्य
पवित्र समृद्धी हे प्रतिकात्मक रूप आपल्या जीवनात साकार होऊन सदैव यशस्वी
व्हा. आपल्या या ज्ञानदानाच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा..............
आपला
योगेश विलास दातीर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा